
दिपमाळ परिसरातील कचरा हटवण्यास सुरूवात
बीड, (रिपोर्टर)ः- खंडेश्वरी परिसरातील दिपमाळ या ठिकाणी नगर पालिकेने मोठया प्रमाणात कचरा टाकलेला आहे. या कचर्यामुळे परिसरात दुर्गधी पसरलेली आहे. ऐतिहासिक ठिकाणी कचरा टाकून नगर पालिका परिसर दुर्गंधयुक्त करत असल्याचे वृत्त सायं.दै.बीड रिपोर्टरने प्रकाशित केले हेाते. याची दखल नगर पालिका प्रशासनाने घेवून सदरील कचरा हटविण्यास सुरूवात केली आहे.
शहरातील कचर्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली पाहिजे. मात्र नगर पालिका प्रशासन शहरातील कोणत्याही भागामध्ये कचरा टाकून त्या ठिकाणी घाण करत आहे. खंडेश्वरी परिसर हा ऐतिहासिक भाग आहे. त्या ठिकाणी भावीक भक्तांची नेहमी रिग असते. खंडेश्वरी परिसरातील दिपमाळ या ठिकाणी नगर पालिकेने कचरा टाकलेला आहे. या कचर्यामुळे हा परिसर दुर्गध युक्त झाला. ऐतिहासिक ठिकाणी अशा पध्दतीने घाण करणे योग्य नाही याबाबतचे वृत्त सायं.दै.बीड रिपोर्टरने प्रकाशित केले होते. याची दखल नगर पालिकेच्या प्रशासनाने घेवून सदरील ठिकाणचा कचरा हलविण्यास सुरूवात झाली आहे.








