बीड, (रिपोर्टर)ः- शासकीय सेवेमध्ये अनेक वर्षे सेवा केल्यानंतर काल एका कर्मचारी विस्तार अधिकारी पदावर सेवानिवृत्त झाला होता. रात्री सदरील कर्मचार्यास हदयविकाराचा झटका आल्याने यामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेहाचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दत्तात्रय वसंतराव कदम (वय 58) हे पाटोदा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून काल सेवानिवृत्त झाले.
अनेक वर्षे त्यांनी शासकीय सेवा केली. वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर रात्री त्यांना हदयविकाराचा तिव्र झटका आल्याने यामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयामध्ये आणण्यात आला होता. त्यांच्या या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.








