
दिड कोटी रूपयांचे नुकसान,नगदी 8 लाख जळाले
शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज
बीड, (रिपोर्टर)ः- शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या माऊली बेकरीला काल पहाटेच्या दरम्यान भिषण आग लागली. या आगीमध्ये बेकरीमधील मशीनरी, मैंदा, साखर, तेल व इतर साहित्य तसेच गल्ल्यातील 7-8 लाख रूपये जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्देवी घटनेने व्यापार्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पेठ बीड पोलिसांनी येवून पंचनामा केला आहे.

दिनेश रमाकांत मोरे यांची एमआयडीसी भागामध्ये माऊली बेकरी आहे. ते बेकरीचे उत्पादन करून इतर विक्रेत्यांना विकतात. परवा श्रावण सोमवार असल्याने मोरे आपल्या कुटूंबासमवेत छत्रपती संभाजीनगर येथील घ्रृणेश्वर मंदिराच्या देवदर्शनाला गेले होते. त्यांच्या बेकरीमध्ये कामगार होते. कामगारांनी पहाटे तीन वाजेपर्यंत काम केले व त्यानंतर ते झोपी गेले. चार वाजण्याच्या दरम्यान बेकरीला भिषण आग लागली. ही आग अटोक्यात आली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्मिध्ये बेकरीमधील मशिनरी, साखर, मैंदा, तेल व गल्ल्यातील 7-8 लाख रूपये नगदी जळून खाक झाले. मोरे कुटूंब परत आल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार पेठ बीड पोलिसांकडे केली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या दुर्देवी घटनेने व्यापार्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदरील ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.








