बीड, (रिपोर्टर)ः- यावर्षी पासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. आतपर्यंत बीड जिल्ह्यात 26 हजार 540 अर्ज आले आहेत. प्रवेशाची क्षमता 61 हजार 40 एवढी आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया दिवसेदिवस कमी होवू लागली. विद्यार्थी कला, वाणिज्य या शाखेला प्रवेश घेण्याऐवजी इतर कोर्ससाठी अॅडमिशन घेत असल्याने प्रवेश प्रक्रियेची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील प्रवेश संख्या कमी झालेली आहे.
विभागात 2 लाख जागा रिक्त आहेत.
दहावीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. ही ऑनलाईन प्रक्रिया 21 मे पासून सुरू झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये प्रवेशाची क्षमता 61 हजार 40 एवढची असून आता पर्यंत फक्त 26 हजार 540 अर्ज आलेले आहेत. कमी प्रमाणात अर्ज येण्याचे कारण म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेवू लागल्याने कला, वाणिज्य या सारख्या शाखेला प्रवेश घेण्याची संख्या कमी होवू लागली आहे. विभागात देखिल अकरावीची प्रवेश क्षमता कमी आहे. विभागामध्ये 2 लाख जागा रिक्त आहेत.








