
बीड (रिपोर्टर): सोशल मिडियावर तलवार, बंदूक घेऊन फोटो प्रसारीत करणार्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र पाटोदा तालुक्यातील गणेश पवार याच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.
गणेश पवार (रा. कुसळंब ता. पाटोदा) हा इसम हातात तलवार, बंदूक घेऊन फोटो काढतो आणि हे फोटो सोशल मिडियावर टाकतो. त्याच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. सदरील व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी गोविंद सदाशिव बारगजे (रा. धानोरा रोड) यांनी केली आहे.








