नाव गोपनीय ठेवू, बक्षीस देऊ -पंकज कुमावत यांचे आवाहन
बीड (रिपोर्टर): महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपासाबाबत मोठी अपडेट येत असून या प्रकरणाचा तपास करणारे एसआयटी पथक प्रमुख पंकज कुमावत यांनी जाहीर पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात कोणाला काही माहिती असेल, माहिती द्यायची असेल तर त्यांनी कुमावत यांच्या वैयक्तिक मोबाईल क्र. 9990782431 या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन कुमावत यांच्याकडून करण्यात आले आहे. माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवून योग्य बक्षीस देण्यात येणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
परळी तालुक्यातील भोपला येथील महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री आठ ते नऊ च्या सुमारास परळी कोर्टासमोरील मोकळ्या जागेत हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नियुक्त केली असून या एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. या हत्या प्रकरणात कोणाला काही माहिती द्यायची असेल, कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी कुमावत यांचे मोबाईल क्र. 9990782431 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणार्याचे नाव कोणत्याही परिस्थितीत उघड केले जाणार नाही. तसेच माहिती देणार्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.








