शहरात चोरीचे प्रमाण वाढले.
बीड (रिपोर्टर): बीड शहरातील नगर नाका परिसरात उभ्या असलेल्या थार कंपनी च्या चारचाकी गाडीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवार रोजी सायंकाळी 6 ते 6:30 च्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गाडीचे मालक दीपक तेलंग हे नगर नाका परिसरातील जिम ला गेले असता त्यांनी त्यांची थार या कंपनीची गाडी जिचा क्रमांक चक -23-इक-7575 ही गाडी पार्किंग मध्ये लावली होती. सात ते साडे सात च्या दरम्यान जिम करून झाल्यावर त्यांना त्यांची गाडी आढळून आली नाही. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून,पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. याचा पुढील तपास शिवाजी नगर पोलीस स्टेशन चे पोलीस करत आहेत.








