
पक्षाचा मेळावा पुढे ढकलला -राजेंद्र मस्के
बीड (रिपोर्टर): बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नियोजित 13 ऑगस्ट 2025 रोजीचा मेळावा प्रदेश कार्यालयाच्या सुचनेवरून पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष मा. आ. शशिकांत शिंदे व प्रदेश सरचिटणीस आ. श्री. रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये 13 ऑगस्ट 2025 रोजी बीड जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. परंतु प्रदेश कार्यालयाच्या सूचनेवरून नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील कार्यक्रम नंतर कळवण्यात येईल.








