
धनंजय मुंडेंनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत
लातूर (रिपोर्टर): येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत अहे. त्यासाठी ते विमानाने लातूरमध्ये डेरेदाखल झाले तेव्हा माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे स्वागत केले.
लातूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा भव्यदिव्य पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
त्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे लातूर शहरात विमानाने डेरेदाखल झाले. या वेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी लातूर येथील विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. या वेळी त्यांच्या सोबत पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, आ. रमेश कराड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.








