
त्यांना शिवसैनिक रस्त्यावर फिरु देणार नाहीत -गणेश वरेकर.
बीड (रिपोर्टर): पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना सचिव विनायजी राऊत साहेब, संपर्कनेते सुनिलजी प्रभू साहेब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब,व संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर यांच्या नेतृत्वाखाली व माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर व महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रमिलाताई माळी,तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन, तालुकाप्रमुख विनायक बप्पा मुळे, उपजिल्हाप्रमुख रामराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बीड जिल्हा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले, जय भवानी, जय शिवाजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धवसाहेब तुम आगे बढो , कलंकित मंत्री यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा गगनभेदी घोषणा शिवसैनिक देत होते यामुळे हा परिसर शिवसेनामय झाला होता.यावेळी सर्व मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर, माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर, तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन यांनी सांगितले की, हे महाराष्ट्रातील सरकार वोटिंग मशीनमध्ये घोळ करून, मतदारांना विविध आमिष दाखवून भ्रष्टनितिने सत्तेवर बसलेले आहे , मंत्रिमंडळात ज्यांना घेतले आहे,त्यांची वागणूक उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे, चड्डी बनियानवर विधान भवनातील सवयंपाक करणार्या कर्मचार्यांना मारहाण करणे, विधानभवनात मंत्र्यांनी रम्मी खेळणे , सिगारेट ओढणे हे काय चाललंय किती माज चढलाय या मंत्रायाला , दिवसाढवळ्या महाराष्ट्रात खुश पांढले जातात , महिलांवर बलात्कार होत आहेत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हे बंद न झाल्यास यापुढे उद्धव साहेब यांच्या आदेशानुसार शिवसैनिक यांना रसत्यावर फिरु देणार नाहीत असे त्यांनी सांगितले या आंदोलनाला उपतालुकाप्रमुख रामनारायण जाधव, जिल्हा सहसचिव श्रीकृष्ण गायके,तालुका संघटक कलिम शेख ,तालुकसहसचिव संदिप भानप, युवा नेते मुकेश घुमरे, सर्कल प्रमुख अशोक खांडे
उपतालुकाप्रमुख अशोक सगळे , ज्ञानेश्वर सिंघन, रामा जाधव, बाळासाहेब वरेकर, विनोद कुटे ,आदेश कुटे ,बाबु कुटे, गोरख नरनाळे,इस्माईल शेख, शेख इरफान, भिमराव तबके ,भरत खरात,
विशाल शिंदे, ओमकार गोरे ,बाळु वैध ,करणं लांडगे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








