
मुंबई, ठाण्यात रेडअलर्ट, नांदेडमध्ये 12 जण बेपत्ता
परळीत चौघे वाहून गेले, तिघे सुखरुप सापडले, एकाचा मृत्यू
परळीच्या कौडगाव हुडा गावात कार पुरात वाहून गेली
एकाचा मृत्यू तिघांना वाचविण्यात यश

मुंबई-ठाण्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका
रेल्वे वाहतूक विस्कळीत, अंधेरी सबवेवरील वाहतूक तीन तासांपासून बंद
राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले पंचगंगा पात्राबाहर
नांदेहमध्ये 50 म्हशी दगावल्या
परळी (धिरज जंगले): परळी वैजनाथ : तालुक्यातील कडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रस्त्यावर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावरुन मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी सह गाडीतील चार युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी (ता.17) मध्यरात्री 11 ते 12 च्या सुमारास घडली.दरम्यान वाहून गेलेला विशाल बल्लाळ या तरुणाचा मृतदेह आज दुपारी सापडला आहे.
यासंदर्भात तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रस्त्यावर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावर सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. रविवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास दिग्रस (तालुका परळी) येथील अमर पौळ (वय 25), राहुल पौळ (वय 30), पुणे येथील राहुल नवले (वय 23) व विशाल बल्लाळ (वय 23) हे परळी येथील लग्न समारंभातून कोडगाव हुडा मार्गे डिग्रस कडे बलेनो क 100 जात होते.
रात्री अंधारात पुलावरील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने व अंधारामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने कारसह चारही व्यक्ती पाण्यात वाहून गेले, काही जण पुरात झाडात अडकले होते. या घटनेची माहिती कळताच महसूल व पोलीस प्रशासन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजाभाऊ पौळ तसेच दिग्रस व कोडगाव हुंडा पिंपरी येथील ग्रामस्थ यांनी तात्काळ धाव घेत रात्री 1100 वाजेपर्यंत तब्बल तीन तास अथक प्रयत्न करून नदीच पुरातील पाण्यात अडकलेल्या अमर पौळ या युवकास बाहेर काढण्यात यश आले.
मात्र पाण्याचा जोर, नदीचा प्रवाह, अंधार यामुळे इतर तीन जणांना काढणे शक्य झाले नाही. ही शोध मोहीम पहाटे 6 पासून पुन्हा प्रशासन व गावकरी तसेच पोहणारे भोई यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू करून त्यातील राहुल पौळ व राहुल नवले यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु विशाल बल्लाळ अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचे काम पोहणारे भोई यांच्यामार्फत चालू आहे.नगरपालिकेची टीम घटनास्थळी शोध घेण्यासाठी पोहचली असून एन डी आर एफ ची टीम पुण्याहून रवाना झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सांगितले आहे. या घटनेबाबत जिल्हधिकारी बीड व पोलीस अधिक्षक बीड तसेच आमदार धनंजय मुंडे हे लक्ष ठेवून असुन आवश्यक मार्गदर्शन व मदत बचावकार्यास तहसीलदार व्यंकटेश मुंडे घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.
या घटनेमध्ये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पौळ पिंपरी येथील रहिवासी राजाभाऊ पौळ यांना ही घटना समजताच मध्यरात्री आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. राजाभाऊ पौळ याच परिसरातील रहिवासी असल्याने या माहितीचे प्रशासनास सहकार्य लाभले. पाण्याचा प्रवाह कुठे, किती असू शकतो, कुठे कमी आहे, युवक नेटके कुठे असू शकतात ही माहिती असल्याने याचा फायदा प्रशासनाला झाला तसेच रात्रभर प्रशासनास आवश्यक ते सहका केले. याबदल परिसरातील नागरीकांनी राजाभाऊ या कार्याचे कौतुक केले आहे. दरम्यान वाहून गेलेला विशाल बल्लाळ या तरुणाचा मृतदेह आज दुपारी सापडला आहे.
आ. धनंजय मुंडेंची तत्परता
या गंभीर घटनेनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यरात्री-पासूनच यंत्रणा सतर्क केली. विभागीय आयुक्त पापळकर व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी संपर्क साधून पुणे येथून एनडी-आरएफचे पथक बोलावण्यात आले आहे. तसेच आवश्यक असल्यास एसडी-आरएफची टीम किंवा हेलिकॉप्टर मदतीसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. आ. मुंडे यांनी स्वतः या घटनेवर लक्ष ठेवले असून त्यांचे कार्यालय प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. घटनास्थळी राजाभाऊ पौळ, दिग्रसचे सरपंच सुभाष नाटकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. मुसळधार पावसामुळे अडथळे येत असले तरी प्रशासन आणि गावकरी जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बेपत्ता युवकाचा शोध लवकर लागावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.









