
बीड (रिपोर्टर)ः-काल रात्री पोलीसांना मिळालेल्या टिप वरुन गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगांव शिवारामध्ये असलेल्या गोदावरी नदी पात्रात बेेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता.त्यावरुन स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गोदावरी नदीत छापा मारला असता पोलीसांना पाहून वाळू उपसा करणारे पळून गेले. मात्र पोलीसांनी पाठलाग करत टॅक्टर आणि रोडर ताब्यात घेतले. त्यामध्ये टॅक्टर चालक आणि रोडर चालक हे दोघेही बाजूच्या शेतामध्ये आपली वाहने सोडून पळून गेले. तर शेतामध्ये आणि टक्टरमध्ये चोरटी वाळू साठवून ठेवली होती ती जप्त केली.
जप्त केलेली वाळू टॅक्टर असा मिळून 9 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करुन पळून गेलेल्या दोन्ही वाहन चालकावर गेवराई पोलीस ठाण्यात भादवी कलम 303.(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम खटावकर, पो.ह. विकास राठोड, राहूुल शिंदे, अंकुश वरपे, नितीन वडमारे, अर्जुन यादव, अशपाक सय्यद, मनोज परझणे यांनी केली.








