नऊ आरोपी विरोधात वडवणी पोलिसात गुन्हा दाखल
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरातील 29 वर्षे युवकाला बायको करून देण्यासाठी त्याच्याकडून विश्वासाने 1 लाख 70 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाल्या नंतर युवकाच्या फिर्यादीवरून तब्बल नऊ जणांविरुद्ध वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, वडवणी शहरातील पावरलूम वस्तीवरील 29 वर्षीय मजुरी करणार्या युवकाला बायको करून देण्यासाठी त्याच्याकडून विश्वासाने 1 लाख 70 हजार रुपये दि.10 ऑगस्ट 2026 रोजी 11 वाजण्यास घडली राहत्या घरून घेतले. तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले यानंतर काल फिर्याद दिली. 1) महादेव जर्नाधन घाटे रा.उपळी ता.वडवणी 2) कैलास बाबाराव दळवी रा. रिसोड जि.वाशिम 3) जर्नाधन प्रल्हाद थोरात रा. रिसोड ता.वाशिम 4) वनमाला मुन्ना शर्मा, रा. कन्हैय्यनगर जालना 5) राधा मुन्ना शर्मा रा. कन्हैय्यनगर, जालना 6) माधूरी फिरोज खान 7) सोमेश सुनिल वाघमारे रा. रमाबाई नगर, रेल्वे स्टेशन जुना जालना 8) प्रियंका ललितकुमार बाफना रा. वरकड हॉस्पीटल न्यु मोंढा रोड जालना 9) अनोळखी महीला यांच्या विरोधात वडवणी पोलीस स्टेशनला गुरनं 203/2025 कलम 318(2),318(4),3(5) बी.एन.एस 2023 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
तीन आरोपींना अटक
वडवणी पोलीस स्टेशनच्या ठाणेप्रमुख वर्षा व्हगाडे-शिंदे यांच्याशी रिपोर्टरने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे. असं सांगण्यात आले असून त्यांची नावे देण्यात आली नाही. दुपारी तीन वाजेपर्यंत संपूर्ण माहिती प्रेसनोटद्वारे देण्यात येईल. अशी माहिती दिली.








