
बीड, (रिपोर्टर)ः- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी आज कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे तर दुसरीकडे मुलीच्या शोधासाठी तिचे माता पिता जिल्हाधिकारी कार्यालयाासमोर आमरण उपोषण करत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये अनेक कर्मचार्यांची कंत्राटीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या कंत्राटी कर्मचार्यांना सेवेमध्ये कायम करण्यात यावे या सह इतर मागण्यांसाठी आज कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे तर दुसरे आंदोलन एका मुलीच्या शोधासाठी माता पित्याचे आहे. गेल्या काही दिवसापुर्वी मुलगी बेपत्ता झाली असून तिचा अद्याप शोध लावण्यात आलेला नाही. मुलीच्या शोधासाठी आई वडीलांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावे लागत आहे.








