
नदी काठच्या गावकर्यांनी सतर्क रहावे
केज, (रिपोर्टर)ः- गेल्या चार दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने केज येथील मांजरा धरण 90 टक्के भरल्याने या धरणाचे सहा दरवाजे 25 मिटरने उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून 5241.42 क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत आहे. नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने आजु बाजुच्या नागरीकांनी सतर्कता बाळगावी आणि नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
चार दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाने अनेक तलावे 100 टक्के भरले आहेत. केज तालुक्यातील मांजरा धरण 90 टक्के भरले आहे. धरण भरल्याने धरणाचे सहा दरवाजे 25 उचलण्यात आल्याने या दरवाजातून 5241.42 क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणाची साठवण क्षमता 242.093 दलघमी एवढी आहे. धरणातून लातूर, अंबाजोगाई, धारूर, कळंब, केज शहरासह लातूर औद्योगिक वसाहत व शेकडो गावाना पाणी पुरवठा होतो. तसेच धरणामुळे केज, कळंब, अंबाजोगाई, लातुर, रेणापुर या तालुक्यातील 18 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र ओलिता खाली येते. त्यामुळे पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनासाठी हे धरण वरदान आहे. याच कारणाने धरणातील पाणी साठ्यावर पाच तालुक्यातील लाखो नागरीक व शेतकर्यांचे लक्ष असते. सध्या स्थितीत धरणात पिण्याच्या व सिंचनाच्या दृष्टीने पुरेसा पाणी साठा झालेला आहे.









