
बीड (रिपोर्टर): जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्या असून सदरील शाळा दुरुस्त करण्यात याव्यात, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण द्यावे यासह आदी मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने झोपा काढो आंदोलन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आल्या आहेत, काही शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या असून या शाळांच्या इमारती सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासन कुठल्याही हालचाली करत नाही. शासन आणि प्रशासनाने शाळा सुधारण्याकडे लक्ष दद्यावे, प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आगळेवेगळे झोपा काढो आंदोलन करण्यात येत आहे.या वेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.






