उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईच्या सेवेत – प्रवक्ते भागवत तावरे
मुंबई (रिपोर्टर): गेली चार दिवस मुंबईसह राज्यभर संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण झालेला असून अनेक भागात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे.शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत असताना विरोधी पक्षाचे नेते मंडळी मात्र यावरून राजकारण आणि निवडणुकांची तयारी करत असल्याचे सांगत सदरील प्रकार दुर्दैवी असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते भागवत तावरे यांनी म्हटले आहे.त्यांनी मुलुंड येथील सभेतील शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याला उत्तर दिले.
राज्यभर सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले असताना सरकार सर्व स्तरावर मदत करत आहे अश्या वेळी महाराष्ट्र धर्म जागवणे अपेक्षित असताना विरोधक मात्र मुंबई तुंबली म्हणून ती जिंकण्याचे स्वप्न पावसात पाहत आहेत . दुःखावर भाकरी भाजण्याचे स्वप्न पाहणार्या विरोधक मित्रांनी राजकीय भाष्य करू नये असे नाही मात्र वेदनेचा बाजार करणे संवेदनशीलतेचे लक्षण नाही . मुलुंड येथील सभेत शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शिशिकांत शिंदे यांनी मुंबई पाण्यात असून गेली पाच वर्षे इथे सरकारने काहीही केले नसल्याचे सांगत येणार्या निवडणुकात मते देण्याचं आवाहन केले . तसे पाहता शिंदे यांनी त्याच पाच वर्षात काही वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्या काळात पाऊस रजेवर नव्हता आणि मुंबई देखील तुंबली होती . दूरगामी समस्यांचे निराकरण दूरगामी प्रयत्नातून होणार असते . आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन असून शेवटच्या घटकापर्यंत सुविधा दिलासा देण्याचा तो प्रयत्न करत आहेत. शासन आणि प्रशासन मदत करत असताना विरोधकांकडून आपत्तीचे राजकारण होणे दुर्दैवी असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते भागवत तावरे यांनी म्हटले आहे.





