गुंदावडगाव शिवारातील घटना
बीड, (रिपोर्टर)ः- मोटार सायकलवर जात असतांना स्पीड ब्रेकरवरून गाडी जोरात आदळल्याने पाठी मागे बसलेल्या 32 वर्षीय महिला गाडीवरून खाली पडल्याने यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुंदावडगाव शिवारामध्ये घडली आहे.
कैलास गंपू चव्हाण (रा.अंबूनाईक तांडा, खांडवी ता.गेवराई) हे मोटार सायकलवरून जात असतांना त्यांच्या पाठी मागे बसलेली महिला वंदना शिवाजी राठोड (वय 32) ही गाडीवरून खाली पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तिला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे.





