
गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने अधिकार्यांच्या बैठका
बीड, (रिपोर्टर)ः- येत्या पाच दिवसावर गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद असल्याने त्या अनुषंगाने व बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यव्यवस्थे संदर्भातला आढावा घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरिक्षक विरेंद्र मिश्र हे आज सकाळी बीडमध्ये आले असून सकाळी त्यांनी काही अधिकार्यांची बैठक घेवून त्यांना योग्य ते निर्देश दिले आहेत.
27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तसेच ईद -ए-मिलाद ही असल्याने हे दोन्ही उत्सव शांततेत साजरे व्हावेत यासाठी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतचा आढावा घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरिक्षक विरेंद्र मिश्र हे आज सकाळी बीडमध्ये आले आहेत. त्यांनी सकाळी काही पोलीस अधिकार्यांची बैठक घेवून त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.जे पेंडींग चारशिट आहेत ते दाखल करण्याचे निर्देश ही दिलेले आहेत. शांतता कमिटीची बैठक देखिल त्यांनी घेतली असल्याचे सांगण्यात येते.





