
एक अटक, इतर आरोपी फरार
बीड, (रिपोर्टर)ः- घरामध्ये घुसून एका तरूणास घातक शस्त्राने मारहाण करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना बीड शहराजवळ असलेल्या पालवण येथे घडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी पोलिसांना अटक केले असून इतर आरोपी फरार झाले आहेत.

विलास भारत मस्के (वय 32 रा.पालवण) या तरूणाला घराच्या बाहेर बोलवून निखिल मस्के सह, इतरांनी घातक शस्त्राने मारहाण केली. या मारहाणीत सदरील तरूण गंभीर रित्या जखमी झाला. त्याच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विलास मस्के याच्या फिर्यादीवरून आरोपी निखिल मस्के सह इतर पाच जणांविरोधात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुख्य आरोपी निखिल मस्के याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपी मात्र फरार आहेत.





