
गुडघ्याचे बाशिंग लवकरच मस्तकी
आठ ते दहा दिवसात जि.प,पं.स चे आरक्षण जाहिर होणार?
बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाचे अंतिम प्रभाग रचना पुर्ण झालेली आहे. आता आरक्षणाकडे लक्ष लागून आहे. गटाचे आणि गणाचे पुन्हा आरक्षण काढण्यात येणार असून येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आरक्षणाीच प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आरक्षणानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. जिल्ह्यात 61 गट आणि 122 गण आहेत. एक गट तर दोन गण या निवडणूकीच्या वेळी वाढलेले आहेत.
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीला आता चालना मिळू लागली. 14 जुलै रोजी जि.प. गट आणि गणाचा प्रारूप आराखडा जाहिर करण्यात आला होता. यावर 66 आक्षेप आलेले होते. या आक्षेपाचे निवारण केल्यानंतर काल अंतिम प्रभाग रचना पूर्ण करण्यात आली आहे. आता गटाचे आणि गणाचे आरक्षण कधी पडतंय याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. येत्या आठ ते दहा दिवसामध्ये गट आणि गणाचे आरक्षण जाहिर होईल असे सांगण्यात आले. जिल्ह्यात 61 गट व 122 गण आहेत. केज तालुक्यात 1 गट आणि 2 गण वाढलेले आहेत.





