धसे खा.सोनवणेंच्या जवळचे, खेडकरांच्या फिर्यादीवरून फसवणूकीचा गुन्हा
शिरूर, (रिपोर्टर)ः-शेत तलावाच्या दुरूस्तीचे टेंडर मिळवून देतो सह आपण पार्टनर शिपमध्ये काम करू असे म्हणत खेडकर यांच्याकडून तब्बल 2016 साली 13 लाख 50 हजार रूपये घेतले. मात्र त्यानंतर ना काम दिले, ना पैसे परत केले. यामुळे धनंजय धसे यांच्या विरोधात अखेर भरत खेडकर यांनी चकलांबा पोलिसात तक्रार दिली. त्यावरून धसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय धसे हे सध्या विद्यमान खा.बजरंग सोनवणे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र खा.सोनवणे यांच्या कार्यालयाकडून धसे यांच्याकडे ऑन रेकॉर्ड कुठलेही अधिकृत पद नसल्याचे माध्यमांना सांगितले आहे. धसे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, शिरूर तालुक्यातील वडाची वाडी येथील भरत नवनाथ खेडकर यांनी इ.स.2016 साली धनंजय धसे यांच्या आश्वासनावर पैसे दिले होते. धसे म्हणाले होते तुम्हाला शेत तलाव दुरूस्तीचे टेंडर मिळवून देतो, आपण दोघे पार्टनर शिपमध्ये काम करू, मात्र 2016 ते आजपावेत धसे यांनी ना काम दिले, ना पैसे परत केले. या प्रकरणी अखेर भरत खेडकर यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात धनंजय धसे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून धसे यांच्या विरोधात गुन्हा रजि.नं. 304/2025 कलम 420 भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय धसे हे खा.बजरंग सोनवणे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक असल्याचे सांगण्यात येते. मात्र सोनवणे यांच्या कार्यालयाकडून धसे यांच्याकडे कुठलेही अधिकृत पद नाही. त्याचबरोबर ते आमचे स्वीय सहाय्यक नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. धसे हे दिल्ली आणि मुंबई येथे सातत्याने उपस्थित असल्याचे दिसून आलेले आहे. कार्यकर्ते ही ते असतात अशी गुजबुजतात.





