
वाळू बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ
जिल्हा प्रशासनाने वाळूचे टेंडर काढावे, कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून वाळूचे टेंडर काढण्यात आलेले नाही. वाळू उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायीकांसह कामगार, मजूर यांच्यावर झाला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचे टेंडर काढून वाळू सुरू करावी यासह इतर मागण्यांसाठी आज आरसीसी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शेकडो कामगार सहभागी झाले होते. मोर्चाने शहर दणाणून गेले होते.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून वाळूचे टेंडर काढले नाही. वाळू अभावी बांधकाम ठप्प झाले आहे. बांधकामावर हजारो मजूरांचा उदरनिर्वाह आहे. बांधकाम बंद असल्यामुळे कित्येक मजूरावर उपासमारीची वेळ आली. जिल्हा प्रशासनाने मजूरांच्या हितासाठी वाळूचे टेंडर काढून वाळू खुली करावी त्याच बरोबर कामगारांना 90 दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांकडून देण्यास नकार दिला जात असून ते तात्काळ देण्यात यावे, नोंदणी व नृतनीकरणाशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने निकाली काढण्यात यावे, विविध लाभासाठी भरलेले प्रलतबित अर्ज त्वरील निकाली काढावेत, कामगारांना अडथळा निर्माण करणार्या किरकोळ त्रुटी काढणे थांबवावे यासह इतर मागण्यांसाठी कामगारांनी हा मोर्चा काढला होता. सदरील हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता.
कामगारांनी हातात घोषणा फलक घेत प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. या घोषणांनी नगर रोड परिसर दणाणून गेले होते. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष अलिम पटेल, शेख मुख्तार, मोईनोद्दीन फारूक मोमीन, शेख अमजद, बंडू दळवी, सय्यद अजमत अली, शेख मोईनोद्दीन, मारूती शिंदे, कागजी अबरार, एजाज गूलाम, इफरोज कादर शेख, त्रिंबक बळे, आसाराम राऊत, शेख इसाकोद्दीन, सय्यद इलियास, मोमीन इफतेखार, कालू बेग, शेख तस्लीम, जाकेर पठाण, संजू गायकवाड, चंद्रकांत काळे, शेख जमील, रहिम पठाण, राजचंद परदेशी, फैसल शेख,शेख अहेमद, शेख आबेद,शेख अदिल यांच्यासह आदींची उपस्थिती होती.





