
भाऊ भावजईने खोटे कागदपत्रे तयार करून जमिन हडवली
कारवाईच्या मागणीसाठी शेतकरी झाला आक्रमक
बीड, (रिपोर्टर)ः- भावाने खोटे कागदपत्र तयार करून जमिनीचा फेरफार करून घेतल्याचा आरोप करत भाऊ भावजई व इतर लोकांविरोधात कारवाई होत नसल्याने एका शेतकर्यांने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खालच्या ग्राउंड परिसरात अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या शेतकर्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान शेतकर्यासमवेत त्याची पत्नी देखिल होती. पत्नीच्या आरडा ओरडन्याने याने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हादरून गेला होता.
रामहरी महादेव वायबसे (रा.कासारी ता.जि.बीड) यांचे भाऊ संभाजी महादेव वायबसे व भावजई सुरेखा संभाजी वायबसे यांनी खोटे कागदपत्रे तयारी करून जमिनीचे फेरफार करून घेतले. या प्रकरणी रामहरी वायबसे यांनी संबंधितविरोधात गुन्हे दाखल देखिल केले आहेत. मात्र त्यांच्या विरोधात कारवाई होत नाही. संभाजी वायबसे, सुरेखा वायबसे, बाबुराव डोईफोडे ,लक्ष्मण वायबसे, दिपक डोईफोडे, सखाराम कदम या सहा लोकांविरोधात कारवाईची मागणी रामहरी वायबसे सतत करत आहेत. त्यांच्या या लोकांविरोधात कारवाई होत नसल्याने आज रामहरी वायबसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जावून खालच्या फ्लोअरमध्यें अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. यावेळी त्यांची पत्नी देखिल त्यांच्या समवेत होती. पोलिसांनी रामहरी वायबसे यांना ताब्यात घेतले.दरम्यान वायबसे कुटूंबि 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे.






