
सर्वपक्षीयांकडून पोलिसांना निवेदन
परळी (रिपोर्टर); शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केला असून या प्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील सर्वपक्षीयांच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे.
काल एका बालिकेवर अत्याचार करर्यात आला. सदरील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या प्रकरणातील दोषी आरोपींविरोधात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सर्वपक्षीयांच्या वतीने करण्यात आली आहे.






