
उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची अन् शेतीची चिंता मिटली
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेली तीन ते चार दिवस चांगला पाऊस पडला. या पावसामुळे तलावात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला.यापुर्वी पडलेल्या पावसामुळे अनेक तलाव 70 टक्कयांपर्यंत भरली होती. तीन ते चार दिवसाच्या पावसाने तलावे 100 टक्के भरली आहेत. तलावात पाण्याचा मुबलक साठा जमा झाल्याने उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची अन् शेतीची चिंता मिटली आली. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे दोन्ही ही धरणे तुडूंब भरलेले आहेत.
यावर्षी देशात चांगला पाऊस झाला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. या पुर्वी पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील धरणामध्ये 50 टक्क्याच्या आत पाण्याचा साठा जमा झालेला होता. मात्र ऑगस्टमध्ये पडलेल्यापावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली. तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे तर धरणे काटोकाट भरली आहेत. जिल्ह्यातील बिंदूसरा, सिंदफणा, बेलपारा, महासांगवी, कडा, कडी, तलवार, कामळी, वाण, बोरणा, बोधेगाव, सरस्वती, कुंडलिका, वाघे बाभुळगाव, माजलगाव, मांजरा, उखंडा ही धरणे 100 टक्के भरली आहेत . बीड शहराला माजलगाव आणि बिंदूसरा या दोन धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. ही दोन्ही धरणे ओसांडून वाहत आहेत त्यामुळे शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही. जिल्ह्यातील धरणे भरल्यामुळे उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची व शेती पिकांची चिंता मिटली आहे.






