
लाखोंचा मुद्देमाल जप्त.
बीड रिपोर्टर – बीड जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई करून अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धाडीत विविध ब्रँडची देशी व विदेशी दारू, तसेच बनावट दारू तयार करण्याचे साहित्यही पोलिसांना आढळून आले. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
परळी ते धर्मापुरी कडे जात असतांना, गुप्त माहिती द्वारे आयपीएस ऋषिकेश शिंदे यांना माहिती मिळाल्यानंतर धर्मापुरी गावामध्ये आरोपी संतोष मस्के वय ४० याच्या मुसक्या आवळण्यात परळी पोलिसांना यश आले आहे. आरोपी संतोष मस्के याच्या कडे ३ लाख ५३ हजारांचा दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास आयपीएस ऋषिकेश शिंदे, पीएसआय संजय फड, राजकुमार मुंडे, आवले हे करत आहेत.








