
बीड (रिपोर्टर): दहा दिवसांच्या उत्साहानंतर काल गणेश विसर्जन झाले. शहरामध्ये मोठ्या उत्साहात श्रीला निरोप देण्यात आला. उत्सवा दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये डीजेवर प्रशासनाने बंदी घातली होती.
त्यामुळे पारंपारिक पद्धतीचे वाद्य लावून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. काही गणेशाचे सकाळी तर काहींचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले. रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जनाला परवानगी देण्यात आली होती. जिल्ह्यात शांततेमध्ये गणेश विसर्जन पार पडले.







