
सहा शेतकर्यांचा 15 एकर ऊस जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान
वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकर्यांचे झाले नुकसान
गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील कोलतेवाडी येथील शेतकर्यांच्या उसाला आग लागली. या आगीमध्ये सहा शेतकर्यांचा दहा ते पंधरा एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदरील ही आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात आले. वीजवितरण कंपनीकडे अनेक वेळा मागणी करूनही त्यांनी विजेच्या तारा व्यवस्थीत केल्या नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीकिसन रामभाऊ मुळुक, अंकुश रामभाऊ मुळुक, कचरू रामभाऊ मुळुक, लक्ष्मण बाबुराव आबदर, पांडुरंग शेषेराव जगताप आणि राजेंद्र बाबुराव मुळुक यांच्या उसाला आग लागली. या आगीमध्ये दहा ते पंधरा एकर उसाचे नुकसान झाले. या शेतकर्यांचे कोलतेवाडी शिवारामध्ये शेत आहे. या शेतातून विजेची तार गेलेली आहे. तारा व्यवस्थात नसल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात आले. यात संबंधित शेतकर्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.









