
बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरासह इतर ठिकाणी आज सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. राज्यातही इतर ठिकाणी पाऊस पडत आहे. आज उद्या आणि परवा तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे.
राज्यातील रत्नागिरी, सातारा, बीड, अहिल्यानगर, लातुर, परभरणी, हिंंगोली, नाशिक, चंद्रपुर, नागपुर, गडचिरोली, गोदिंया या जिल्ह्याला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पा्ऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.








