दानवे यांनी केली चौसाळा येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
बीड, (रिपोर्टर)ः- विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा आ.अंबादास दानवे यांनी आज चौसाळा येथे नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. शेतीचे नुकसान पाहता शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेती पिके पुर्णतः उध्दवस्त झाली. आज विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेती पिकांची पाहणी केली. शेतीची अवस्था पाहता शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दानवे यांनी केली. शेतकर्यांची संवाद साधत त्यांनी शेतकर्यांना धीर देण्याचे काम केले. यावेळी त्यांच्या समवेत विलास महाराज शिंदे, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम, गणेश वरेकर, मिराताई नवले, नितीन धांडे, संजय महाद्वार, राजाभाऊ महुवाले, सुशील पिंगळे, गोरख सिंघन, रतनगुजर, नवनाथ प्रभाळे, रवि वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.








