
रिपाइंच्या माध्यमातून गायरान धारकांचा लढा राज्यभर उभारणार-कागदे
बीड, (रिपोर्टर)ः- रिपाइंच्या माध्यमातून गायरान धारकांचा लढा राज्यभर उभा करण्यात येणार असून गायरान जमिनी नावे करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना 15 दिवसात भेटणार असल्याचे रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी म्हंटले आहे.
गायरान जमिनी प्रश्ना संदर्भात आज रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना पप्पू कागदे म्हणाले की, गायरान धारकांचा लढा गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे. हा लढा राज्यभर उभा करण्यात येणार आहे. गायरान प्रश्नी केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना येत्या पंधरा दिवसात भेटणार असून त्यांच्याशी गायरान जमिनी संदीर्भात चर्चा करण्यात येणार आहे.गायरान जमिनी नावे करावी अशी मागणी करण्यात येणार आहे असे कागदे यांनी म्हंटले आहे. या आंदोलनाला जिल्हाभरातील रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजु जोगदंड, मजर खान, किसन तांगडे. अशोक साळवे, किशोर कांडेकर, अविनाश जावळे, दिपक कांबळे. महादेव उजगरे, धोडीराम शिरसाट, गयाताई मिसळे, दशरथ सोनवणे, राणी गायकवाड, बापू पवार, शाहु डोळस, संदिपान डोंगरे, राहुल वाघमारे, अरूण निकाळजे, लक्ष्मण शिरसाट, गोवर्धन वाघमारे, राहुल सुरवसे यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.








