
बीड, (रिपोर्टर)ः- पावसाने बीड जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बीड येथे आले आहेत. त्यांनी बीड तालुक्यातील पिंपळवाडी, बेलखंडी सह आदी गावातील शेती पिकांची पाहणी केली.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यापावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. आज प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तालुक्यातील पिंपळवाडी, बेलखंडी, पाटोदा, नागझरी, मानेचा वाडा, कचारवाडी, दत्त नगर, बेलखंडी पाटोदा या ठिकाणी जावून तेथील पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खा,बजरंग सोनवणे, आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के सह आदींची उपस्थिती होती.








