
नागपूर (रिपोर्टर): धाराशिवमध्ये लोकांचे संसार वाहून गेले, घर उजाडलं, पिकं बुडाली आयुष्याची कमाई पावसात वाहून गेली. इतकी वाईट वेळ आली असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नाचत आहेत. शेतकरी रडत असताना जिल्हाधिकारी नाचत आहेत, यावरून यांना परिस्थितीचे किती गांभीर्य आहे हे स्पष्ट दिसत आहे, अशी टीका काँग्रेसचे ते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सरकार असंवेदनशील असल्याने प्रशासनही बेदरकारपणे वागत आहे. प्रशासनाचे ‘आग लगे बस्ती मैं, हम हमारे मस्ती मैं’ असे सुरू आहे.
इतके संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासन असताना सामान्य जनता, शेतकर्यांनी मदतीची अपेक्षा ठेवू नये. या नाच गाण्यातून वेळ मिळेल तेव्हा पंचनामे होतील, तेव्हा मदत मिळेल. जसे सरकार तसे प्रशासन आहे शेतकर्यांच्या बांधावर गेले पाहिजे, लोकांना धीर दिला पाहिजे असं असताना जिल्ह्याचा प्रमुख नाचत आहे, यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.









