
बीडच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी 2012-13 साली धावून आलेले सिनेअभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाऊंडेशनने पुन्हा एकदा शेतकर्यांच्या मदतीसाठी धावा केचला आहे. एका व्हिडीओद्वारे या दोघांनी दानशूर व्यक्तींना आवाहन करताना महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यात अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त केली आहे, अनेक शेतकर्यांचे जनावरे पाण्यात वाहून गेले आहेत.
अनेक ठिकाणी खाण्यापिण्याची अडचण आहे. अशा वेळी शासन मदत करील ते काय करील परंतु आपलेही कर्तव्य आहे असं म्हणत दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन दान करावे, असे आवाहन या दोघांनी केले आहे. विशेषत: बीड जिल्ह्यातल्या सिरसमार्ग भागातील 300 हेक्टरवरील मोसंबी उद्ध्वस्त झाल्याचे सांगत अधिक माहिती घेत कुठे काय मदत करायची ते आपण पाहू असं दोघांनीही म्हटले आहे. या वेळी नाना पाटेकर यांनी कृपया वापरलेले कपडे देऊ नका, असं सांगत धान्य शिजवण्यासाठी त्यांच्याकडे इंधन आहे का याचाही विचार केचला जाईल, माहिती घेतली जात असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले.








