
बीड जिल्ह्यातील पावणेसात हेक्टर शेती पाण्यात
बीड (रिपोर्टर): मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारी आल्यानुसार राज्यातील 52 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली आहे. सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झाले. मराठवाड्यातील 32 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर गोदाकाठी असणार्या अनेक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 50 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली आहे. मराठवाड्यातील 32 लाख हेक्टर शेती बाधीत झाली. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 लाख 36 हजार 528, जालना जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार 82 हेक्टर, परभणी जिल्ह्यातील 2 लाख 73 हजार 33 हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील 2 लाख 73 हजार 413 हेक्टर, नांदेड जिल्ह्यातील 6 लाख 54 हजार 501 हेक्टर, बीड जिल्ह्यातील 6 लाख 95 हजार 871 हेक्टर, लातूर जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 438 हेक्टर, धाराशीव जिल्ह्यातील 4 लाख 49 हजार 681 हेक्टर शेती बाधीत झाली. मराठवाड्यातील सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे. गोदाकाठच्या नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांश नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.








