बीड जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांसाठीची अडीच वर्षांची आरक्षण सोडत मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीतून विविध प्रवर्गांसाठी सभापतीपद निश्चित करण्यात आले आहे.
बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) शैलेश सुर्यवंशी आणि उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या एका सभापती पदाची सोडत परळी पंचायत समितीस लागली आहे.
🔹 आरक्षणाचे तपशील पुढीलप्रमाणे :
- अनुसूचित जाती : परळी
- ओबीसी : बीड
- ओबीसी महिला : गेवराई, धारूर
- सर्वसाधारण महिला : माजलगाव, आष्टी, शिरूरकासार, अंबाजोगाई
- सर्वसाधारण : केज, वडवणी, पाटोदा
जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी वेगवेगळ्या प्रवर्गानुसार आरक्षण निश्चित झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. आगामी काळात विविध राजकीय पक्षांकडून या जागांवर सभापतीपदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणामुळे आता ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे ठरण्यास सुरुवात झाली असून, आगामी निवडणुकीत उमेदवारी ठरवताना पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.









