
एक एससी, तीन खुल्या प्रवर्गातील महिला, तीन ओबीसींसाठी जागा सुटणार
बीड (रिपोर्टर): स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज बीड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर होणार असून दुपारी तीननंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या इमारतीत आरक्षणाची सोडत पार पडणार आहे.
जिल्ह्यात अकरा पंचायत समित्या आहेत. या पंचायत समिती सभापतीपदांचे आज दुपारनंतर आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामध्ये एक एससी, तीन सर्वसाधारण महिला, तीन ओबीसी आणि इतर जागेसाठी जनरल आरक्षण निघणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर आता पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण निघत आहे.









