• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

आक्रोश, हंबर्डा, गदगद अन् अश्रू , ‘परत या… परत या… मेटे साहेब परत या’

by Beed Reporter
August 15, 2022
Reading Time: 1 min read
0
आक्रोश, हंबर्डा, गदगद अन् अश्रू , ‘परत या… परत या… मेटे साहेब परत या’
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आक्रोश, हंबर्डा, गदगद अन् अश्रू
‘परत या… परत या… मेटे साहेब परत या’

शिवसंग्राम भवनापासून निघाली अंत्ययात्रा, साश्रू नयनांनी हजारोंचा सहभाग, राज्यभरातून समर्थकांची साश्रू नयनांनी उपस्थिती, हृदय पिळवून टाकणारे आप्तस्वकियांसह महिलांचे हंबर्डे, टाळ-मृदंगाचा निनाद, मेटेंच्या कार्याचा जयघोष
बीड (रिपोर्टर) सर्वसामान्य शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेऊन मेटे कुटुंबाचेच नव्हे तर अखंड मराठा समाजाचे कडवे नेतृत्व करणारे समाजाबरोबर कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य वंचितांचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडणारे मराठ्यांचा बुलंद आवाज, शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांचा पार्थीव रात्री उशीरा बीडमध्ये आणण्यात आला. रात्रीपासून हजारोंच्या संख्येने समर्थकांसह सर्वक्षेत्रातल्या मान्यवरांनी आणि सर्वसामान्यांनी विनायक मेटेंचे अंत्यदर्शन घेतले. आज सकाळी शिवसंग्राम भवनात त्यांचा पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता तेव्हा परिसरच नव्हे तर अवघे शहर शोकाकुल होते. आक्रोश, टाहो, हंबर्डा, दाटलेले कंठ, पानावलेल्या डोळ्यांनी जो तो विनायक मेटेंच्या निपचीत पडलेल्या देहाकडे पहात होता. मधेच कुणी ‘परत या परत या, मेटे साहेब, परत या’, ‘अमर रहे अमर रहे मेटे साहेब अमर रहे’च्या घोषणा देत होते.

आप्तस्वकिय आणि महिला वर्गाच्या हंबर्ड्याने अवघा परिसर धीर-गंभीर होता. दुपारी एक वाजता विनायक मेटेंच्या पार्थीव देहाची अंत्ययात्रा शिवसंग्राम भवनापासून निघाली. या वेळी आमदार, खासदार, मंत्री, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, कष्टकरी, कामगार, शेतकरी, व्यावसायिक, सर्वसामान्य या अंत्ययात्रेमध्ये साश्रू नयनांनी सहभागी झाले होते. काहींच्या हातात शिवसंग्रामचे भगवे निशान होते, टाळ-मृदंगाचा निनाद चालू होता. मुखी हरिनाम घेत विनायक मेटेंची अंत्ययात्रा शहरातून अंत्यविधीस्थळी गेली.


मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे महाराष्ट्राच्या प्रत्येक सरकारविरोधात मराठ्यांना न्याय देण्यासाठी आक्रमक होणारे समाजाबरोबर बहुजन समाजाचे प्रश्‍न रस्त्यावर आणि विधीमंडळात मांडणारे शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटेंचे काल पहाटे मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघाती दुर्दैवी निधन झाले. या घटनेने अवघा महाराष्ट्र दु:ख सागरात बुडाला. रात्री उशीरा विनाक मेटेंचे पार्थीव बीड शहरात आणण्यात आले. मुंबईवरून बीडमध्ये येताना रस्त्यावरून अनेक जणांनी रात्री उशीरा रस्त्याच्या कडेला उभे राहून अंत्यदर्शन घेतले. पहाटेच्या दरम्यान मेटेंच्या निवासस्थानी त्यांचा पार्थीव ठेवण्यात आला. भल्या पहाटेपासून साश्रू नयनांनी हजारो समर्थकांसह विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सकाळी नऊच्या सुमारास मेटेंचा पार्थीव शिवसंग्राम भवन येथे आणण्यात आला. यावेळी शिवसंग्राम भवनावर अंत्यदर्शनासाठी साश्रू नयनांनी अलोट गर्दी उसळली होती. आक्रोश, टाहो, हंबर्डा फोडत मेटेंचे चाहते आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. आप्तस्वकियांसह महिलांच्या हंबर्ड्याने उपस्थितांचे हृदय हेलावून जात होते. ज्या माणसाने उभ्या आयुष्यात संघर्ष करत यशाची पताका फडकवली त्या माणसाचा असा दुर्दैवी अनपेक्षित मृत्यू उपस्थितांना मान्य नव्हता. जो तो मेटेंच्या निधनाने दु:ख व्यक्त करताना आपले अनुभव सांगत होता.

दुपारी एक वाजता विनायक मेटेंचा पार्थीव फुलाने सजवण्यात आलेल्या एका गाडीमध्ये ठेवण्यात आला. आणि तेथून विनायक यांची अंत्ययात्रा सुरू झाली. ‘परत या…परत या… मेटे साहेब परत या…’ ‘अमर रहे.. अमर रहे… मेटे साहेब अमर रहे…’ च्या घोषणांनी अवघं शहर दणाणून गेलं होतं. अंत्ययात्रा जशी जशी पुढे जात होती तसे तसे लोक अंत्ययात्रेत सहभागी होत होते. शहरातून ही अंत्ययात्रा थेट बीड-औरंगाबाद रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजुला असलेल्या त्यांच्या शेतात निघाली होती. या वेळी अंत्ययात्रेमध्ये आमदार, खासदार, मंत्री, डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, शतेकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य, अधिकारी-कर्मचारी यांच्यासह सर्वक्षेत्रातले लोक साश्रू नयनांनी सहभागी झाले होते.

अंत्यविधीला मातब्बर नेते येणार
विनायक मेटेंच्या अकाली अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र शोकाकूल असून आज अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह अनेक मंत्री, आमदार अंत्यविधीला येत आहेत. यातील बहुतांशी लोक हे 3 वाजता बीडजवळ आल्याचे सांगण्यात आले.

धनंजय मुंडे अंत्यविधीस्थळी

माजी मंत्री धनंजय मुंडे हे विनायक मेटे यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. ते अंत्यविधीस्थळी पोहचले असून आ. संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह आ. नमिता मुंदडा, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, सुरेश नवले, राजेंद्र जगताप, जनार्धन तुपे, सिराज देशमुख, केशवराव आंधळे, सुशिला मोराले, पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना, एस.पी. नंदकुमार ठाकूर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन
मुळुक, उपविभागीय अधिकारी टिळेकर, तहसीलदार हजारे, सीईओ ढाकणे
हेही अंत्यविधीस्थळी
दिसून आले.

बीड कडकडीत बंद


राज्यभर आपल्या कर्तव्यकर्माची किर्ती गाजवणारे शिवसंग्रामचे सर्वासर्वे विनायक मेटे यांचा काल अकाली अपघाती दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने बीड जिल्हा शोकसागरात बुडाला. आज दुपारी त्यांच्या पार्थिवदेहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहे. आजच्या या दु:खद प्रसंगी बीड शहरातल्या सर्व व्यापार्‍यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून दुखवटा पाळला. त्यामुळे बीड शहर आज कडकडीत बंद दिसून आले. नेकनूर येथील व्यापार्‍यांनी आपआपले व्यवहार आज बंद ठेवून विनायक मेटेंना श्रध्दांजली वाहिली.

अनेकांच्या अश्रुंचे बांध फुटले
राजेगाव ते मुंबई असा वादळी प्रवास करणारे शिवसंग्रामचे सर्वासर्वे विनायक मेटेंचे अपघाती निधन जिल्हावासियांनाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला धक्का देणारे होते. आज विनायकरावांचा पार्थिवदेह अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवनात ठेवण्यात आला होता. यावेळी अंत्यदर्शनासाठी आलेल्या अनेकांचे अश्रुंचे बांध फुटले. डोळे पाणावले. अश्रु घळघळ वघळले.

शहरात पोलिस डेरेदाखल
शिवसंग्रामचे सर्वेसर्वा माजी आ.विनायकराव मेटे यांची आज दु.1 वा. शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा काढण्यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी शहरात डेरेदाखल झाले होते. या अंत्ययात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्यासह डिवायएसपी संतोष वाळके यांच्यासह बीड शहर पोलिस ठाण्याचे पीआय रवि सानप, ग्रामीणचे पीआय संतोष साबळे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पीआय केतन राठोडसह आरसीपीचे जवान शहरात डेरेदाखल झाले होते.

Previous Post

विनायक मेटे यांच्या अपघातानंतरच्या घटनांची चौकशी करा, पत्नी ज्योती मेटे यांची मागणी

Next Post

reporter apdet mete मेटेंचे जाने व्ययक्तीक दृष्ट्या मोठी हाणी- फडणविस

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
reporter apdet mete मेटेंचे जाने व्ययक्तीक दृष्ट्या मोठी हाणी- फडणविस

reporter apdet mete मेटेंचे जाने व्ययक्तीक दृष्ट्या मोठी हाणी- फडणविस

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?