
माजलगाव (रिपोर्टर): बीड माजलगाव तालुक्यातील छोटीवाडी येथे मोठीवाडी चौकात आज दिनांक 11अक्टोबर रोजी सकाळी 10:00 वा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई ड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई, पुरग्रस्तांना एकरी लाख रुपये नुकसान भरपाई, संपूर्ण कर्जमाफी, 100% पिक विमा द्या, भूमिहीनांना 25 हजार रुपये सहानुभूती पर अनुदान द्या.या मागण्यासाठी तब्बल दिड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली त्यावेळी वाहनाच्या दुर दुर रांगा लागल्या होत्या. यावेळी तहसील प्रशासनाने आंदोलकाच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.








