
बीड, (रिपोर्टर)ः- एका महिनाभराच्या कालावधीच्या आतमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदआणि पंचायत समिती यांच्या निवडणूकीच्या संदर्भाने कोणत्याक्षणी आचारसंहिता आयोगाकडून घोषीत होवू शकते त्या अनुषंगाने 8 ऑक्टोंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी निवडणूक आयोगाने प्रसिध्दी केली आहे. या निवडणूकी आधी मतदाराला आपले न ाव शोधणे चुका दुरूस्त करणे एक संकेस्थळी प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक ही मतदार यादी प्रसिध्द करतांना ग्राह्य धरला आहे. त्याच दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी वापरात येणार आहे. त्या आधारे करण्यात आलेल्या जि.प., नगर पालीका आणि पंचायत समिती यांचे प्रभाग, गट आणि निर्वाचन गण या साठी या प्रारूप मतदार यादीतून नाव शोधणे, मतदाराला सोपे होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत मतदाराला तहसिल कार्यालय आणि नगर पालिका, नगर पंचायत या ठिकाणी निश्चित केलेले शुल्क भरून ती मिळविता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीची तयारी केली असून मतदारांनी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी. हीींिीं://ारहरीशर्लीेींंशीश्रळीीं.ळप/जलक्षशलींळेपजपउश्रळलज्ञ/ऊेुपश्रेरवतेींशीश्रळीीं








