यावर्षी सुट्टयामध्ये घट
बीड, (रिपोर्टर)ः- शालेय शिक्षण विभागाने दिपावलीच्या सुट्ट्यांची आदीसूचना प्रसिध्द केली असून या शैक्षणिक वर्षे 2025-26 मध्ये दिपावलीसाठी 16 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र 2 नोव्हेंबरला रविवार आल्यामुळे 3 नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू होतील. या वर्षी 21 दिवसांऐवजी 17 ते 18 दिवसच दिपावलीच्या शैक्षणिक सुट्ट्या मिळणार आहेत.
काल प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी या दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या पत्रकाने या सुट्ट्यांच्या आदीसूचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये 16 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर असा या सुट्ट्यांचा कालावधी आहे. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये किमान 238 कार्यदिवस असले पाहिजेत उन्हाळी आणि दिवाळी अशा मिळून एकूण 75 दिवस सुट्ट्या असावेत असे ही या पत्रकात म्हंटलेले आहे. त्यामुळे सहाजिकच 15 ऑक्टोंबरपर्यंत इयत्ता 1 ते 12 वी पर्यंत प्रथम सत्र परिक्षा पार पडणार आहेत.








