
नागरीकांचे तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण
गेवराई (रिपोर्टर): राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट राहिल्याने बागपिंपळगाव परिसरातील शेतकर्यांना येण्या-जाण्यास त्रास होत असल्याने सदरील काम पुर्ण करण्यात यावे या मागणीसाठी नागरीकांचे तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे.
एनएच 52 राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. सदरील काम बागपिंपळगाव परिसरामध्ये अर्धवट ठेवण्यात आले. या अर्धवट कामामुळे शेतकर्यांना व नागरीकांना येण्या-जाण्यास त्रास होवू लागला आहे. काम तात्काळ करून नागरीकांनी गैरसोय दुर करण्यात यावी अशी मागणी सातत्याने बागपिंपळगाव ग्रा.पं. च्या वतीने करण्यात आली. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने आज नागरीकांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.








