
बीड (रिपोर्टर): सावरगाव येथील दसरा मेळाव्यातून सोन्याची साखळी चोरण्यात आली होती. या प्रकरणी अंमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील चोरट्याचा स्थानीक गुन्हे शाखेने शोध लावला असून चोरट्यास सोन्याच्या साखळीसह जेरबंद करण्यात आले आहे.
लहू काशीनाथ नागरगोजे (रा. रोहतवाडी ता. पाटोदा) हे दसर्याच्या दिवशी मेळाव्यास गेले होते. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरली. या प्रकरणी त्यांनी अंमळनेर पोलिसात तक्रार दाखल केली होती. सदरील या घटनेचा तपास स्थानीक गुन्हे शाखेने लावला असून साखळी चोर आकाश सोपान ससाणे (रा. राजुरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या जवळील दोन तोळे सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे. सदरील ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आनंद मस्के, बाळू सानप, यादव, सिद्धेश्वर मांजरे यांनी केली आहे.








