
स्पॉट पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल
केज, (रिपोर्टर)ः- टपरी चालकास तलवारीने मारहाण करून शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदरील घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस तीन दिवसानंतर दाखल झाले होते.
सय्यद इर्शाद सय्यद अलीम या टपरी चालकास तलवारीने मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणार्याने हातात तलवारी घेवून शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दिलदारसिंग गोके, शंकरसिंग गोके, अमरसिंग गोके, धरमसिंग गोके, तिलकसिंग गोके व इतर चार अशा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस तीन दिवसानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी दाखल झाले होते.








