बीड (रिपोर्टर): तलाठ्याला हाताखाली धरून चुलत बहिणीने भावाची 0.60 आर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. सदरील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी तलाठ्यासह बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास मारुती मोरे (रा. वायभटवाडी ता. बीड) यांची बहीण रत्नमाला बाजीराव मोहिते हिने वायभटवाडीचे तलाठी पठाण यांना हाताखाली धरून गट नं. 256 मधील 0.60 आर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. सदरील हा प्रकार मोरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पठाण व रत्नमाला मोहिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन तलाठी पठाण हे सध्या मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.








