
माजी आ.नारायणराव मुंडेंसह आदींचे उपोषण
बीड, (रिपोर्टर)ः- सातारा जिल्ह्यातील फलटण येथे डॉ.संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकार्यांच्या छळाला कंटाळूनआत्महत्या केली.या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी आ.डॉ.नारायणराव मुंडे यांच्यासह आदींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
डॉ. संपदा मुंडे हिने वरिष्ठ पोलीस अधिकारी व काही राजकीय पुढार्यांच्या सतत होणार्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्यापुर्वी स्वतःच्या हातावर तिने दोषींची नावे लिहून ठेवलेली आहेत. सदरील हा प्रकार अत्यंत दुर्देवी असून या प्रकरणाची सखोल चौकशी होवूनसंबंधिता विरोधात कारवाई करावी यासाठी एसआयटी मार्फत चौकशीची मागणी माजी आ.डॉ.नारायणराव मुंडे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करण्यात येत आहे.








