मुंबई – राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. या निवडणुकांमध्ये 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीची घोषणा होताच 4 नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या, 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
🗓️ निवडणुकीचे वेळापत्रक
- नामनिर्देशन अर्ज : 10 नोव्हेंबर
- अर्जाची अंतिम तारीख : 17 नोव्हेंबर
- छाननी : 18 नोव्हेंबर
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 21 नोव्हेंबर
- चिन्ह वाटप : 26 नोव्हेंबर
- मतदान : 2 डिसेंबर
- निकाल : 3 डिसेंबर
🗳️ मतदारांची संख्या
- एकूण मतदार : 1,07,03,576
- महिला मतदार : 53,22,870
- मतदानासाठी 13 हजार कंट्रोल युनिट्स तयार
🏛️ गुलाबी मतदान केंद्र
- काही मतदान केंद्रांवर महिला अधिकारीच असतील
- दिव्यांग, ज्येष्ठ व माता-बाळ असणाऱ्या मतदारांना प्राधान्य
- मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 जनजागृती मोहिमा
💰 उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ
- अ वर्ग नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी खर्च मर्यादा ₹15 लाख
- क वर्ग नगरपालिकेसाठी ₹7 लाख
📲 दुबार नावांसाठी डबल स्टार यंत्रणा
- मतदार यादीत दुबार नाव असलेल्या मतदारांच्या नावाशेजारी डबल स्टार () चिन्ह**
- अशा मतदारांकडून निवडणुकीपूर्वी एक घोषणापत्र घेतले जाईल
- एकाच मतदान केंद्रावरच मतदान करण्याची परवानगी
📍 विभागनिहाय निवडणुका
- कोकण – 17
- नाशिक – 49
- पुणे – 60
- छ. संभाजीनगर – 52
- अमरावती – (उर्वरित आकडे जाहीर होणार)
या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत.






