बीड, (रिपोर्टर)ः- छत्रपती संभाजीनगर ते बीड राष्ट्रीय महामार्गासह अन्य भूसंपादन प्रकरणात शेकडो कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे काल उघड झाले. याचा मास्टर माईंड बीडच्या भूसंपादन कार्यालयातील साधा मंडल अधिकारी संजय हांगे हाच असल्याचे आता उघड होत असून संजय हांगेंची गाव आणि शहरी भागातील मालमत्ता पाहता गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात हांगे याने शेकडो कोटी रूपयांची मालमत्ता अवैध्य आणि भ्रष्ट मार्गाने कमवल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात शासन एकीकडे गंभीर असल्याचे दाखवत आहे परंतु शेकडो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी अटक केलेल्या संजय हांगेच्या मालमत्तेवर अद्याप लाचलुचपत प्रतिबंधक किंवा ईडी यांनी छापा टाकला नाही. या बाबत जनतेत उलट सुलट चर्चा ऐकाव्यास येत असून भ्रष्ट मार्गाने कमवलेली माया ईडी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त करावी अशी मागणी आता सर्व सामान्यातून होत आहे.
मागील दहा वर्षापुर्वी पुरवठा विभागामध्ये पाच कोटी रूपयांचा भ्रष्टाचारही संजय हांगे आणि इतर कंपनीने केला होता. त्याच्यामध्ये हांगे हे वर्षेभर निलंबितही होते. मात्र शासन दरबारी आपले सर्व वजन वापरून केवळ 22 लाख रूपये भरून परत ते शासकीय सेवेत आले होते असे ही त्यावेळेस शासकीय वर्तृळात चर्चीेले जात होते. पुरवठा विभागातील घोटाळा पचल्यामुळेच पुन्हा संजय हांगे यांनी भूसंपादनात घोटाळा केला असावा. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यापासून ते जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून कोट्यावधी रूपयांचा घोटाळा करतात. हा घोटाळा करतांना त्यांना कशाचीच भिती वाटत नाही. संजय
हांगे याने आतापर्यंत जमिन आणि प्लॉटच्या माध्यमातून शेकडो कोटींची मालमत्ता कमवलेली आहे. मात्र ही मालमत्ता त्यांनी स्वतःच्या नावावर न करता काही नातेवाईक आणि मित्र कंपनीच्या नावावर केल्याचे ऐकण्यात येत आहे. गाड्या घोड्याही त्यांच्या कडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये संजय हांगेच्या जवळच्या व्यक्तीच्या नावावर आलेल्या मालमत्तेचिही चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करावी आणि ती जप्त करावी. त्यांच्यावरही ते दोषी असतील तर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सामान्य जनतेतून केली जात आहे. संजय हांगे यांना केवळ निलंबन हीशिक्षा पुरेशी नसून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी होत आहे.










