• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गर्भपात प्रकरणी आ. लक्ष्मण पवार विधीमंडळात आक्रमक, विशेष पथकामार्फत तपासाची आरोग्यमंत्र्यांची घोषणा, ठाकरे-शिंदे गट आमने-सामने

by Beed Reporter
August 18, 2022
Reading Time: 1 min read
0
गर्भपात प्रकरणी आ. लक्ष्मण पवार विधीमंडळात आक्रमक, विशेष पथकामार्फत तपासाची आरोग्यमंत्र्यांची घोषणा, ठाकरे-शिंदे गट आमने-सामने
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आरोग्यमंत्र्यांच्या बीड फेमसच्या वक्तव्यावर विधीमंडळात गोंधळ; ठाकरे-शिंदे गट आमने-सामने, फेमस शब्द बीडचा अपमान करणारा; कामकाजातून शब्द काढण्याची मागणी

भागवत जाधव । गेवराई
बीड तालुक्यातल्या बक्करवाडी येथील अवेध गर्भपाताचे प्रकरण गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांनी विधीमंडळात उपस्थित करत सदरचे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवावे. यात आणखी तपास करावा अशी मागणी केली असता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याप्रकरणाचा पून्हा एकदा विशेष पथकामार्फत तपास केला जाईल तसेच जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवले जाईल अशी घोषणा केली. मात्र याचवेळी बोलताना तानाजी सावंत यांनी गर्भलिंग निदान आणि गर्भपाताबाबत बीड जिल्हा फेमस आहे असे वक्तव्य केल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना आमदारांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट याप्रकरणावरून आमने सामने आले. यावेळी अजित पवार यांनी मध्यस्थी करत फेमस हा शब्द कामकाजातून वगळावा अशी मागणी केली.

बीड तालुक्यातल्या बक्करवाडीमध्ये शितल गाडे या 30 वर्षीय महिलेचा गोठ्यामध्ये गर्भपात करताना 5 जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेने अवघा जिल्हाच नाही तर महाराष्ट्र हादरून गेला होता. या प्रकरणात काही जणांना अटक करून त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला आहे. आज विधीमंडळामध्ये गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांनी महाराष्ट्र सरकारचे लक्ष बीड जिल्ह्यातल्या अवैध गर्भपात आणि लिंगनिदान विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. ज्या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला आहे त्याबाबत ज्या डॉक्टराने हा गर्भपात केला त्याचे नाव समोर आले. नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सरकारला तीन प्रश्‍न विचारत हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टामार्फत चालवावे अशी मागणी केली. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या प्रकरणाचा पून्हा एकदा विशेष पथकामार्फत तपास केला जाईल. तसेच जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवले जाईल अशी घोषणा केली. लक्ष्मण पवारांनी महत्वपूर्ण प्रश्‍नाला हात घातला. मात्र गर्भलिंग निदान आणि गर्भपात बीड जिल्ह्यात सातत्याने होत असल्याने आरोग्यमंत्र्यांनी बीड जिल्हा गर्भपाताबाबत फेमस असल्याचे वक्तव्य केले आणि इथेच सभागृहामध्ये आरोग्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत काही आमदारांनी गोंधळाला सुरूवात केली. शेवटी अजित पवारांनी हस्तक्षेप करून फेमस हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा आहे. तो कामकाजातून वगळावा असे म्हटले.

गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस
सावंतांच्या उत्तराने ठाकरे गट आणि
शिंदे गटाच्या आमदारात खडाजंगी
बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील एका महिलेचा अवैध गर्भपातामुळे झालेला मृत्यू या प्रश्‍नावर उत्तर देताना सभागृहात शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या आमदारात खडाजंगी, गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस (लोकप्रिय) आहे, असं उत्तर तानाजी सावंत यांनी दिलं, पण फेमस म्हणजे लोकप्रिय या शब्दावर ठाकरे गटातले आमदार सुनिल प्रभू यांनी तीव्र आक्षेप घेतला, यानंतर सावंतांच्या मदतीला शंभूराज देसाईही उठले, अजित दादांनी यात हस्तक्षेप करत फेमस हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा असून तो कामकाजातून वगळण्यात यावा अशी सूचना केली, या सूचनेचा विचार केला जाईल असं आश्‍वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं.

आ.सोळंकेंनीही उपस्थित केला प्रश्‍न
या प्रकरणात एमबीबीएस असलेला डॉक्टर सहभागी आहे का? असा प्रश्‍न माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना सावंत यांनी नाही असे उत्तर दिले परंतू पोलिस तपासात औरंगाबाद येथील सतिष सोनवणे हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. हे समोर आलेले आहे. तर आ.शेलार यांच्या प्रश्‍नावर आरोग्यमंत्री सावंतांनी विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली.

मुंदडा म्हणाल्या, मनिषासारख्या
आणखी किती एजंट?
बीडच्या गर्भपाताचे प्रकरण आज विधीमंडळात चांगलेच तापले. या प्रकरणात केजच्या आ.नमिता मुंदडा याही बोलल्या. जालना व औरंगाबादमधील शिकाऊ डॉक्टराने गेवराईत येवून अनेकदा गर्भलिंगनिदान केल्याची कबुली पोलिसांना दिली. परंतू ज्यांचे निदान झाले आहे त्या महिला कोण? त्याचे पुढे काय झाले? मनिषा सानप सारख्या आणखी किती एजंट आहेत? याचा तपास पोलिसांनी लावलेला नाही. यासारख्या अनेक मुद्यावरून आ.मुंदडा यांनी गृहविभागात तक्रार केली.

Previous Post

भाजपाला घरचा आहेर, विधीमंडळात मुजोर अधिकार्‍यांविरोधात भाजपा आमदार आक्रमक; वादग्रस्त वासुदेव मोरे निलंबीत; डिवायएसपी जायभायची उचलबांगडी

Next Post

टाकरवणजवळ स्कॉर्पिओची दुचाकीला धडकएक ठार; एक जखमी

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
दुचाकी अपघातात दोन ठार, जरुड जवळील घटना

टाकरवणजवळ स्कॉर्पिओची दुचाकीला धडकएक ठार; एक जखमी

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?